हुंड्याची देवाणघेवाण थांबवणार आहात का ?

Image
 हुंडामुक्त समाज निर्माण होणार...? - भूषणआप्पा कारंजकर माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार.. जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात ९५ % लग्नात हुंडा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भारतीय   समाजासाठी अतिशय लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.भारत स्वातंत्र्य होऊन आज अनेक वर्षे उलटून गेलीत. समाज दिवसेंदिवस सुशिक्षित होत चाल्लाय असे आपण नेहमीच म्हणतो..परंतु समाज खरंच सुशिक्षित झालाय का ? सुशिक्षित म्हणजे फक्त लिहिता वाचता येणे,इंग्लिश मध्ये बोलणे, शिक्षण घेऊन चांगली नौकरी मिळविणे, उच्च राहणीमान असणे बस्स एवढंच असतं का ?. आपला समाज शिक्षण घेतोय खरा परंतु जोपर्यंत.. मानसिक आणि वैचारिक सुशिक्षितता येत नाही तोपर्यंत समाजाला सुशिक्षित म्हणता येणार नाही. भारतातील ग्रामीण भागातच काय शहरी भागात सुद्धा आजही हुंड्यांवरून लग्न मोडण्याचे प्रकार दिसून येतात. आज मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलाचं जेवढं शिक्षण तेवढंच किंवा त्याहीपेक्षा जास्त मुलींचं आहे. मुली विदेशात सुद्धा शिक्षण घ्यायला गेल्यात, मुलींनी चंद्रावर सुद्धा झेप घेतली पण तरी आजही ह्या भारतीय मानसिकतेत हुंडा घेण्याची प्रथा जिवं...

केवळ चेहरे बदलून काय साध्य होणार साहेब..?

 कार्यपद्धतीमध्ये बदल करा मोदी साहेब..


new cabinet of modi government.new cabinet minister.
The new cabinet of Modi government i.e central government

- भूषणआप्पा कारंजकर

माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार..

मोदी सरकारच्या मंत्री मंडळात कायापालट झाला..काही जुने चेहरे काढून नव्या आयाराम चेहऱ्यानं संधी देण्यात आली.चेहरे बदलून कार्यपद्धती बदलणार का हा प्रश्नच आहे.कारण मोदी सरकारमध्ये मला नाही वाटत मंत्र्यांना स्वतःच्या मतानुसार निर्णय घेता येत असतील.या मंत्रिमंडळ फेरबदलाचा फायदा फक्त एवढाच की जे जुने चेहरे होते ते जनतेला बातम्यांमध्ये का होईना पण ते मंत्री होते हे माहित झाले.मोदी सरकार मध्ये कुठल्या मंत्री पदाचा कारभार कुणाकडे आहे हे जनतेला कळतच नाही.कारण अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा कुठला चेहरा निर्णय घेताना दिसतच नाही.मंत्री मंडळात मंत्री आहेत खरे पण त्यांना नर्णय स्वातंत्र्य आहे का ? की हे फक्त One Man मंत्रिमंडळ आहे ? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. ज्या मंत्र्यांनी राजीनामा दिला त्यांनी आपापल्या खात्यात काय निर्णय घेतलेत, कोणती कामे केलीत हा खर तर  संशोधनाचाच विषय आहे.

मोदी सरकारची दुसरी टर्मही आता मध्यावर येत आहे.पहिल्या टर्म मध्ये सुद्धा या सरकारने काय दिवे लावलेत हे जनतेला आता कळून चुकले आहे.फेकू सरकार अशी ओळख या सरकारची होत चालली आहे. आपली योजना राबविताना आर्थिक परिस्थिती वा शिक्षण तशेच बेरोजगारी अश्या अन्य मुद्द्यांना हात घालायचा नाही हा या सरकारचा निर्धार.आपला प्राधान्यक्रम राबविताना इतर क्षेत्राचं  कितीही नुकसान झाले तरी चालेल ही या सरकारची वृत्ती. औद्योगिक क्षेत्रातलं धोरण आम्हाला जस वाटेल तस आम्ही राबवू ..आम्हाला कुणी सल्ले देऊ नये. बेरोजगारीच्या प्रश्नावर कुणी बोलू नये आणि विचारुही नये. ही या सरकारची भूमिका.

या मंत्रिमंडळ विस्तारात मोदींनी इतर पक्षातून आलेल्याना मात्र उत्तम संधी दिलेली आहे.त्यामुळे निष्ठावंतांकडून  थोडीफार नाराजी व्यक्त केली जाऊ शकते.परंतु मादी सरकारची आजवरची हुकूमशाही वृत्ती पाहता मंत्रिमंडळात समावेश झाला नाही म्हणून कुणी बंड पुकारेल असे वाटत नाही.जोतिरादित्य शिंदे,नारायण राणे, भारती पाटील अश्या आयारामांना भाजप कश्या मोठ्या संधी देतो याचा दाखल देऊन मोदींनी इतर पक्षातल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण केली.

पहिल्या टर्म मध्ये मोदी सरकार काही विशेष कामगिरी करू शकलेले नाही. नोटबंदी सारखा नियोजनशून्य निर्णय घेऊन आपल्याला सरकार चालविता येत नाही हे दाखवून दिले. दुसऱ्या टर्म मध्ये सुद्धा अर्थव्यवथा नीट सांभाळता येत नाही आहे..देशाततली बेरोजगारी वाढवून ठेवली आहे.राज्यांना त्यांचा GST चा परतावा देण्यास टाळा टाळ केली जात आहे. Reserve बँकेकडील राखीव निधीवर डोळा ठेवण्याचे काम  या सरकारद्वारे केले जात आहे.इतकी भयानक परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झाली आहे.

प्रत्येक राजकीय पक्षाचा स्वतःचा असा एक कार्यक्रम असतो व त्यानुरासार नियोजन केले जाते व प्राधान्यक्रम ठरतो.परंतु भाजपाचा तसा कुठलाही कार्यक्रम नाही वा नियोजन सुद्धा दिसत नाही.ज्या राममंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा २ खासदारावरून ३०० च्या पार गेली ते राममंदिर सुद्धा आता पूर्ण होणार.त्याबद्दल धन्यवादच.परंतु जनतेला दिवसरात्र देवधर्माचच वेड नसत.त्यांच्या काही महत्वाच्या गरजा सुद्धा असतात.शिक्षण ,रोजगार,आरोग्य हे सर्वसामान्य जनतेचे चिंतेचे विषय असतात.त्यामुळे सरकारने जनतेचे जीवनमान कशे उंचावता येईल याकडे लक्ष द्यावे,बेरोजगारी कशी दूर करता येईल,गरिबी,भूखमारी इ. गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करावा. कारण मोदी सरकार आले तेव्हापासून देशाचा विकासचं खुंटला.देशामध्ये गरिबी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. 

मोदी सरकार कोरोना सारखी परिस्थिती हाताळण्यात पूर्णतः अपयशी ठरलं.आरोग्य क्षेत्रातल्या नियोजनाबाबत किती निष्काळजी आहे हे दिसून आले.लसीकरण मोहिमेची लत्तरे उडाली, देशातल्या जनतेच्या आरोग्यासाठी लसीकरणाच नियोजन अजिबात मोदी सरकारला जमल नाही.मात्र आपल्या चुका मान्य करण्यासाठी स्वतःच्या अंगी धाडस व मनाचा मोठेपणा लागतो आणि तो या सरकारच्या अंगी अजिबात नाही.जो चुका दाखवेल तो देशद्रोही असा दृष्टिकोन सरकारचा असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे.  

जनतेने एवढे अजस्त्र बहुमत देऊन सुद्धा देशाचा विकास करता येत नसेल तर जनतेला चुकीच्या लोकांना मत दिल्याचा पस्तावा झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या हुन्दुत्वाचा मुद्दा धरून तुम्ही सत्तेत आलात त्या हिंदू जनतेला महागाईच्या खाईत,बेरोजगारीच्या संकटात लोटतांना थोडा तरी विचार करा.कारण आता बऱ्याच हिंदू जनतेच्या मुखात काँग्रेसच चांगली होती हे शब्द असतात. त्यामुळेच चेहरे बदलविण्यापेक्षा कार्यपद्धतीत बदल करा मोदी  साहेब..देशाचा विकास तरी होईल.



Some of our popular Mypoliticalviews.

- दरवर्षी लाखो युवकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वप्नाचा चुराडा...!

- सत्तेपेक्षा देशातील महागाईकडे लक्ष असू द्या साहेब..!

- अधिवेशनात नेमकं साधलं तरी काय..!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हुंड्याची देवाणघेवाण थांबवणार आहात का ?

अधिवेशनात नेमकं साधलं तरी काय..!

सत्तेपेक्षा देशातील महागाईकडे लक्ष असू द्या साहेब..!