हुंड्याची देवाणघेवाण थांबवणार आहात का ?

 हुंडामुक्त समाज निर्माण होणार...?


dowry iamge. dowry system.



- भूषणआप्पा कारंजकर

माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार..

जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात ९५ % लग्नात हुंडा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भारतीय   समाजासाठी अतिशय लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.भारत स्वातंत्र्य होऊन आज अनेक वर्षे उलटून गेलीत. समाज दिवसेंदिवस सुशिक्षित होत चाल्लाय असे आपण नेहमीच म्हणतो..परंतु समाज खरंच सुशिक्षित झालाय का ? सुशिक्षित म्हणजे फक्त लिहिता वाचता येणे,इंग्लिश मध्ये बोलणे, शिक्षण घेऊन चांगली नौकरी मिळविणे, उच्च राहणीमान असणे बस्स एवढंच असतं का ?. आपला समाज शिक्षण घेतोय खरा परंतु जोपर्यंत..मानसिक आणि वैचारिक सुशिक्षितता येत नाही तोपर्यंत समाजाला सुशिक्षित म्हणता येणार नाही.

भारतातील ग्रामीण भागातच काय शहरी भागात सुद्धा आजही हुंड्यांवरून लग्न मोडण्याचे प्रकार दिसून येतात. आज मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलाचं जेवढं शिक्षण तेवढंच किंवा त्याहीपेक्षा जास्त मुलींचं आहे. मुली विदेशात सुद्धा शिक्षण घ्यायला गेल्यात, मुलींनी चंद्रावर सुद्धा झेप घेतली पण तरी आजही ह्या भारतीय मानसिकतेत हुंडा घेण्याची प्रथा जिवंत आहे.आजही समाजात हुंडा दिल्याशिवाय मुलींचा विवाह होत नाही..अशी समाजाची मानसिकता झालेली आहे.त्यामुळे मुली आणि तिचे पालक जोपर्यंत हुंडा देण्याचे थांबवणार नाहीत तोपर्यंत ही प्रथा नष्ट होणार नाही.

माझ्या मते हुंडा घेणे ही प्रथा नाहीच ही एक भीक मागण्याची पद्धत आहे. मित्रांनो ज्यावेळेला कुणी एखाद्या भिकाऱ्याला भीक देत त्यावेळेला भिकाऱ्याची म्हणजेच भीक घेणाऱ्याची मान खाली झुकलेली असते आणि देणाऱ्याची मान ताठ असते..परंतु ह्या हुंडा पद्धतीमध्ये मात्र भीक देणाऱ्याची मान खाली झुकलेली असते आणि घेणारा मात्र मान वर करून अभिमानाने फिरत असतो. मी या समाजाला सांगू इच्छितो.. हुंडा मागायचाच असेल तर प्रेमाचा आणि विश्वासाचा मागा पैसे तर भिकारी सुद्धा मागतो. आपण किती दिवस अशी भीक मागणार आणि देणार आहात..! 

१९६१ पासून आपल्या देशात हुंडा देणे आणि घेणे बेकायदा आहे, मग हा कायदेशीर गुन्हा असतांना सुद्धा आपण हुंड्याची देवाण घेवाण का करतो..? हुंडा दिला नाही तर माझ्या मुलीचे लग्न होणार नाही.. हुंडा तर द्यावाच लागतो असे उदगार अनेक मुलींच्या वडिलांच्या तोंडून बघायला मिळतात.याठिकाणी मुलींच्या वडिलाला कितपत दोष द्यायचा याचा सुद्धा मला प्रश्न पडतो..कारण  ज्यावेळला मी त्यांना दोष देण्याचा विचार करतो त्यावेळेला मला त्या वडिलांची किंवा पालकांची आपल्या मुलीप्रती असलेली काळजी तसेच तिच्या भविष्याबद्दल बापाच्या चेहऱ्यावर असलेली चिंता सुद्धा मला दिसून पडते. हुंडा दिला नाही तर माझ्या मुलीचे लग्न होणार नाही किंवा लग्न होण्यासाठी वेळ लागेल का ? आणि हुंडा न देता लग्न झाले तरी भविष्यामध्ये सासरचे लोक माझ्या मुलीला हुंड्यासाठी त्रास तर देणार नाहीत ना ? असे एकना अनेक प्रश्न त्या बापाच्या मनाला भेडसावत असतात आणि यातूनच तो शेवटी हुंडा देण्याचा निर्णय घेतो. कारण आज जस हास्य माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर आहे तसच हास्य सासरी गेल्यावर सुद्धा राहावं एवढीच त्याची इच्छा असते..असो. हे सगळं खरं...परंतु बापाच्या मुलीविषयी असलेल्या ह्याच चिंतेचा फायदा उचलून त्याला हुंडा मागितल्या जातो. परंतु खरंच मुलीच्या लग्नावरून एवढी चिंता करण्याची गरज आहे  का ..? जर अश्या अनेक मुलीच्या पालकांनी हुंडा न देण्याचे ठरविले तर मुलं तरी किती दिवस लग्न न करता घरात बसतील..! याचा थोडा विचार करावा. याठिकाणी मुली जोपर्यन्त ठरवणार नाहीत, हुंडा न देण्याचा ठाम निश्चय करणार नाहीत तोपर्यंत मात्र काहीच शक्य नाही.आज मुलाच्या खांद्याला खांदा लावून मुलींने प्रगती केलेली आहे. मुली सुद्धा आत्मनिर्भर होत चालल्या आहेत. मग हुंडा तरी कशासाठी आणि का द्यायचा..!अनेक मुली एवढ्या शिकलेल्या असताना, स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या असताना सुद्धा  अश्या वाईट प्रथेला का बळी पडतात याच मात्र मला नवल वाटत असो.

हुंडा समस्या वाढण्याला हुंडा प्रतिबंधक कायद्यात असलेली लवचिकता देखील कारणीभूत आहे. या कायद्याबद्दल लोकांच्या मनातील भीतीच नाहीशी झाली आहे.पोलिसांना सुद्धा थोडेफार आमिष दाखविले की सगळं manage होत असा समज लोकांचा झालाय. सरकारने हा कायदा अधिक कठोर करावा  जेणेकरून या प्रथेला आळा घालण्यास मदत होईल.हुंडा  ही एक सामाजिक विकृती आहे..आणि ही विकृती नष्ट करण्यासाठी मुलींने आणि त्याच्या पालकांनी पुढाकार घ्यायला हवा. तसेच मुलांनी सुद्धा ही भीक मागणे बंद करावे. मुलं जर Doctor  होत असतील, Engineer  होत असतील आणि जर लग्नात असल्या प्रकारची भीक मागत असतील तर त्या शिक्षणाचा तरी काय उपयोग..! मित्रांनो एक मात्र लक्षात ठेवा.. नातं हे हृदयाने जोडल्या जात असत, पैशाने नाही.



some of our popular Mypoliticalviews.

- दरवर्षी लाखो युवकांच्या आणि  त्यांच्या कुटुंबियांच्या स्वप्नाचा चुराडा..!

सत्तेपेक्षा देशातील महागाईकडे लक्ष असू द्या साहेब..!

- Facebook

Comments

Popular posts from this blog

अधिवेशनात नेमकं साधलं तरी काय..!

सत्तेपेक्षा देशातील महागाईकडे लक्ष असू द्या साहेब..!