हुंड्याची देवाणघेवाण थांबवणार आहात का ?
This is the simplest political blog of India and particularly best political blog of Maharashtra. provides latest news in marathi and very best quality of political articles about Maharashtra politics and Indian politics. provides the updated marathi news.various posts on central government politics and Maharashtra government politics.provides the political news of Maharashtra and also political news of India, excellent Marathi political news and articles.we always attempt to provide real truth.
माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार..
विधिमंडळाचे २ दिवसीय अधिवेशन पार पडले..त्यात कामकाज कमी आणि राजकीय कुरघोड्याच अधिक झाल्या..मग ते १२ आमदारांचे निलंबन असो किंवा देवेंद्र फडणवीस यांचा अभिरूप विधानसभा भरविण्याचा प्रयोग असो.नुकसान मात्र जनेचेच झाले.अनेक महत्वाचे मुद्दे चर्चिल्याविनाच राहिलेत. OBC च्या मुद्य्यांवर आमचे १२ आमदार निलंबित झाले असे चित्र तयार करून भाजपने राज्यभर रान पेटवायला सुरवात केली आणि आता तर त्या १२ आमदारांसाठी उच्च न्यायालयात सुद्धा जायचे ठरविले.तामिळनाडूच्या धर्तीवर भाजपने हा निर्णय घेतला असावा..असो. विधानसभेत जे काही घडले ते अतिशय लज्जास्पद..उपाध्यक्षांचा माइक खेचला गेला, शिवीगाळ काय झाली, अध्यक्षांच्या दालनात तर फक्त हाणामारी होण्याची बाकी होती..हे सगळे टाळता आले असते. एक मात्र नक्की भाजपाने उगाचच अति आक्रमक होऊन १२ आमदारांचे निलंबन ओढवून घेतले.
देवेंद्र फडणवीस हे तसे कणखर वक्ते..मोठ्या पातळीवरचे नेते.महाराष्ट्र त्यांच्याकडे एक कर्तृत्ववान विरोधी पक्षनेता म्हणून बघतो.OBC च्या प्रश्नांवर त्यांचा चांगला अभ्यास सुद्धा आहे. OBC च्या प्रश्नांसाठी लढण्याची तळमळ ते दाखवीत आहेत.त्यामागचा हेतू काय असावा हे सांगण्याची गरज नाही.परंतु ज्याप्रमाणे फडणवीस साहेब लढत आहेत त्या बद्दल त्यांचे अभिनंदनच.परंतु आपल्यातील स्पष्ट वक्तृत्वाचा उपयोग करून त्यांनी सत्तापक्षाला जाब विचारायचा असता किंवा नामोहरम करायचे असते.परंतु त्यासाठी संयम असावा लागतो..संयम सुटला की स्वतःच च नुकसान होत याचा प्रत्येय आलाच असावा..असो. या घटनेचा फायदा कसा उचलावा याच नियोजन आता भाजपाने चांगल्या प्रकारे केलेलं दिसत. OBC च्या हक्कांसाठी आमचे १२ आमदार निलंबित झाले आणि त्यासाठी राज्यभर निदर्शने करून हातातून निसटत चाललेली OBC Vote बँक परत आपल्याकडे खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न आता चालू आहे. मुळात १२ आमदारांचे निलंबन हे OBC च्या हक्कांसाठी नव्हे तर शिवीगाळ व माइक खेचण्याचा प्रयत्न यासाठी झालं असावं..असो.महाविकास आघाडीने मात्र OBC आरक्षण तसेच मराठा आरक्षणाचा चेंडू आता केंद्र सरकारच्या कोर्टात टाकून हात वर केलेले दिसतात.यालाच म्हणतात राजकीय कुरघोड्या..असो.
स्वप्नील लोणकर या तरुनाने प्रशासनाला कंटाळून आत्महत्या केल्यामुळे मात्र सरकारला काही निर्णय व घोषणा कराव्याच लागल्या. परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखतच होत नसल्यामुळे नैराश्यातून स्वप्नीलने अत्म्हत्येचा निर्णय घेतला आणि त्याच्या ह्या निर्णयामुळे सरकारला जाग आलेली दिसते..पण खरंच जाग आली का हे येत्या काळात समजेलच.नवीन पदांची भरती करणार,भरती प्रक्रियेत गतिमानता आणणार.अशी आश्वासने उपमुख्यमंत्रि अजित पवार यांनी दिलीत.आता ती कितपत खरी ठरतात हे पुढील काळात बघायला मिळेलच.
आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक.ही निवडणूक काही झाली नाही..हा काँग्रेस ला एक प्रकारचा धक्काच मानावा लागेल.हे सरकार फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी चे आहे आणि काँग्रेस ला डावलण्यात येत आहे असा आरोप नेहमीच होत असतो.त्यात कितपत सत्य आहे हे पुन्हा एकदा बघायला मिळाले.विधानसभा अध्यक्ष पद काँग्रेसकडे आहे परंतु नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर ते रिक्त झाले आणि अजूनही भरण्यात आलेले नाही.दोन दिवसात भास्कर जाधव यांचे मह्त्व फार वाढविण्यात आले..त्यांनाच विधानसभा अध्यक्ष करण्याचा विचार शिवसेनेचा आहे कि काय हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेला पडतोय..असो. ह्या अधिवेशनात अध्यक्ष पदाची निवड होणार अशी आशा काँग्रेसला होती परंतु काँग्रेसला पुन्हा एकदा निराशाच पत्करावी लागली. काँग्रेस चा पाठिंबा आहे म्हणून सरकार आहे हे ह्या सरकारने विसरता कामा नये..अन्यथा भविष्य काय हे वेगळे सांगण्याची गरज नाही...असो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नुकसान मात्र जनतेचच.
Comments
Post a Comment