हुंड्याची देवाणघेवाण थांबवणार आहात का ?

Image
 हुंडामुक्त समाज निर्माण होणार...? - भूषणआप्पा कारंजकर माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार.. जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात ९५ % लग्नात हुंडा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भारतीय   समाजासाठी अतिशय लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.भारत स्वातंत्र्य होऊन आज अनेक वर्षे उलटून गेलीत. समाज दिवसेंदिवस सुशिक्षित होत चाल्लाय असे आपण नेहमीच म्हणतो..परंतु समाज खरंच सुशिक्षित झालाय का ? सुशिक्षित म्हणजे फक्त लिहिता वाचता येणे,इंग्लिश मध्ये बोलणे, शिक्षण घेऊन चांगली नौकरी मिळविणे, उच्च राहणीमान असणे बस्स एवढंच असतं का ?. आपला समाज शिक्षण घेतोय खरा परंतु जोपर्यंत.. मानसिक आणि वैचारिक सुशिक्षितता येत नाही तोपर्यंत समाजाला सुशिक्षित म्हणता येणार नाही. भारतातील ग्रामीण भागातच काय शहरी भागात सुद्धा आजही हुंड्यांवरून लग्न मोडण्याचे प्रकार दिसून येतात. आज मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलाचं जेवढं शिक्षण तेवढंच किंवा त्याहीपेक्षा जास्त मुलींचं आहे. मुली विदेशात सुद्धा शिक्षण घ्यायला गेल्यात, मुलींनी चंद्रावर सुद्धा झेप घेतली पण तरी आजही ह्या भारतीय मानसिकतेत हुंडा घेण्याची प्रथा जिवं...

सत्तेपेक्षा देशातील महागाईकडे लक्ष असू द्या साहेब..!

 मध्यमवर्गाचे अजून किती नुकसान करणार आहात..!


inflation in price of petrol, diesel. the rise in the price of goods and services.

- भूषणआप्पा कारंजकर

माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार...

देशातील सर्वसामान्य जनतेला कोरोना या भयंकर आजारापेक्षा महागाई या अतिभयंकर रोगाची जास्त भीती वाटत आहे.हा महागाईचा रोग जनतेला रोज छळतोय.सर्वसामान्यांचं जीवनमान दिवसेंदिवस विस्कळीत होत चाललंय.देशातील सर्व सामान्य जनता गिरिबीच्या खाईत लोटल्या जात आहे.मात्र याकडे मोदी सरकार पाहिजे तेवढं गांभीर्याने लक्ष देत नाही आहे.या सरकारची पहिली टर्म तर सर्वसामान्य जनतेसाठी फार विशेष अशी तर नव्हतीच परंतु दुसरी टर्म मात्र फार त्रासदायक ठरत आहे.आज कुठल्या गोष्टींची भाववाढ झालेली नाही हे मोदी सरकारने सांगावे. दिवसेंदिवस प्रत्येक गोष्ट सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या पलीकडे चालली आहे.पेट्रोल,डीझेल तर अक्षरशः सर्वसामान्यांच्या खिशालाच आग लावत आहे.गॅस सिलेंडर सामान्यांना परवडत नसल्यामुळे अनेक घरात आता चुली पेटू लागल्या आहेत.इतकी भयानक परिस्थिती या आधी देशामध्ये क्वचितच आली असावी. 

मी मोदी साहेबांना सर्वसामान्यांच्या वतीने विचारू इच्छितो...हेच अच्छे दिन आहेत का ? २०१४ ला तर आपण फार गोड आवाजात घोषणा दिल्या होत्या "अच्छे दिन आयेंगे" आणि बिचारी भोळी जनता सुद्धा बेंबीच्या देठापासून गळा काढू काढू आपल्या पाठोपाठ घोषणा देत होती.इतक्या लवकर आपण विसरलात का..! हा तर सर्वसामान्य जनतेसोबत झालेला धोका आहे...असो. महागाई कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे केंद्र सरकार सांगत तर आहे परंतु किती प्रयत्नशील आहे हे जनतेला दिसतच आहे..प्रत्यक्षात महागाई कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे.पेट्रोल,डीझेल,भाजीपाला, मजुरी,खाद्यान्न,फळे,बांधकामाचे साहित्य,औषधी,कृषी संबंधित वस्तू, घरगुती वापराचा गॅस तसेच अनेक जीवनावश्यक वस्तू अश्या कितीतरी वस्तूंची उदाहरणे देता येतील. वाढत्या महागाईची देखील एक राजकीय किंमत असते याचे भान सत्ताधाऱ्यांनी बाळगावे.कारण या सर्वसामान्य जनतेने तरी अजून किती दिवस आपल्यावरती विश्वास ठेवायचा. आपण अच्छे दिनचे स्वप्न दाखविलेत जनतेने अच्छे दिनचे स्वप्न बघायला सुरवात केली, आपण कोरोना काळात भांडे वाजवायला सांगितले जनतेने डोळे बंद करून भांडे वाजवले..आपण जे सांगाल ते या भोळ्या जनतेने पूर्णपणे विश्वास ठेवून केले. फक्त आपणच आपले कर्तव्य पार पाडायचे विसरलात मोदी साहेब. परंतु आता मात्र जनतेचा विश्वासच उडत चाललाय...असो.२०२४ जास्त लांब नाही आहे.

भारतीय Reserve बँकेच्या गाईडलाईन नुसार महागाईचा दर तीन ते चार टक्क्यांच्या आसपास असावा परंतु देशातील महागाईचा दर तर १३ टक्क्यांच्या वर गेला आहे..आणि ग्राहक किंमत निर्देशांक ६ टक्क्यांच्या वर गेला आहे.ही फार खराब परिस्थिती आहे.दिवसेंदिवस देशाचं वाटोळं होत चाललंय..अर्थमंत्री निर्मला सीतारामन नक्की काय करत आहेत हे जनतेला कळेनासं झालंय.अर्थव्यवस्था सांभाळता येत नसेल तर राजीनामा दिलेला कधीही परवडेल. परंतु या पदावर काम करण्यासाठी केंद्र सरकारकडे सध्या एकही तज्ज्ञ व्यक्ती दिसत नाही.त्यामुळे केंद्र सरकारने माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे तरी मार्गदर्शन घ्यावे..असो.

महागाई जर अशीच वाढत राहिली तर याचा फटका केंद्र सरकारला २०२४ ला नक्कीच बसेल. २०२४ तर सोडाच पण पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब ,उत्तराखंड ,गोवा ,हिमाचल प्रदेश, गुजरात, मणिपूर या सात राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे..तेव्हा जनता योग्य ते उत्तर भाजपाला दिल्याशिवाय राहणार नाही हे केंद्र सरकारने लक्षात घ्यावं. कारण वाढत्या महागाईमुळे यापूर्वी सुद्धा राजकीय पक्षांना आपली सरकारे गमवावी लागली आहेत.कांद्याच्या भरमसाठ किमतीमुळे दिल्लीच्या तत्कालीन मुख्यामंत्री स्व.सुषमाताई स्वराज यांना सरकार गमवावे लागले होते तसेच स्व.शीलादीक्षित यांना सुद्धा वाढत्या महागाईमुळे सत्ता गमवावी लागली होती..असो.

महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात असे आपण सांगत तर आहात त्यामुळेच महागाई जर कमी करण्याचे खरच प्रयत्न चालू असतील तर कृपया आम्हाला आपण सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर जी परिस्थिती देशामध्य होती ती परत द्या..कारण पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्या किमंती तेव्हा काय होत्या आणि आता काय आहेत हे जरा बघून घ्या. आता आपण पेट्रोल ११० रुपयांवर पोहचवले आणि निवडणुका जवळ आल्या की ९५ रुपयाला पेट्रोल मिळेल आणि महागाई कमी झाल्याच्या घोषणा आपण देणार. हे खेळ आता चालणार नाहीत साहेब. आपण सत्तेत यायच्या पहिले ६५-७० रुपयाला पेट्रोल मिळायचे हे लक्षात असू द्यात.आणि त्यावेळेस पेट्रोल खूप महाग झाले असे सांगून आपण कशी काँग्रेस वर टीका करत होतात याची पण आठवण असू द्यात. भोळी जनता आता हुशार होत चालली आहे आणि आपला खरा चेहरा ओळखत चालली आहे. सत्तेपेक्षा महागाईच्या नियंत्रणावर जास्त लक्ष दिले तर सत्ता आपोआपच टिकेल.



Some of our popular Mypoliticalviews.

- केवळ चेहरे बदलून काय साध्य होणार साहेब..?

- दरवर्षी लाखो युवकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वप्नाचा चुराडा...!

- केंद्र सरकार बहिरेपणाचं सोंग घेत आहे की काय ..!



marathi news

news marathi

marathi

latest news in marathi

latest marathi news

marathi news paper

marathi newspaper

today news in marathi

news marathi today

marathi news today

today's news in marathi

breaking news marathi

breaking news in marathi

in marathi


Comments

Popular posts from this blog

हुंड्याची देवाणघेवाण थांबवणार आहात का ?

अधिवेशनात नेमकं साधलं तरी काय..!