हुंड्याची देवाणघेवाण थांबवणार आहात का ?
This is the simplest political blog of India and particularly best political blog of Maharashtra. provides latest news in marathi and very best quality of political articles about Maharashtra politics and Indian politics. provides the updated marathi news.various posts on central government politics and Maharashtra government politics.provides the political news of Maharashtra and also political news of India, excellent Marathi political news and articles.we always attempt to provide real truth.
माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार..
प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील विध्यार्थ्यांना आता मोठी स्वप्ने बघण्याचा आणि साकार करण्याचा अधिकारच राहिला नाही की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रस्थापित व्यवस्थेने आणखी एका होतकरू विद्यार्थ्यांचा बळी घेतला. पुण्याच्या स्वप्नील लोणकर या २४ वर्षाच्या विद्यार्थ्याने प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हतबल होऊन स्वतः च जीवनच संपवलं.त्याला राजपत्रित अधिकारी व्हायचं होत,घरची गरिबी दूर करायची होती, शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडायचं होत.. परंतु ह्या सगळ्या गोष्टी राहूनच गेल्यात .मग याला जबादादर कोण तर फक्त आणि फक्त प्रशासनचं. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि ती प्रकाशात आल्या नंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्राची झोपच उडाली..परंतु सरकार मात्र अजून जागे झालेले दिसत नाही. स्वप्नील लोणकर हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २ वर्षापूर्वीच उत्तीर्ण झाला होता..तेव्हापासून त्याला प्रतीक्षा होती ती मुलाखतीची. स्वप्नील सारखीच अनेक मुले प्रतीक्षेत आहेत..परंतु या नालायक व्यवस्थेला ह्या विद्यार्थ्यांची अजिबात काळजी नाही. मुलाखतीची वाट बघता बघता स्वप्नील ची हिम्मत खचली..शेवटी तो नकारात्मक विचारांच्या फेऱ्यात अडकला.आपण आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, आपण कुठेतरी कमी पडतोय या प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये घर करत होती आणि ह्याच भावनेतून त्याने स्वतः च जीवन संपविले. नेते मंडळींनी स्वतःची मुले राजकारणात आमदार,खासदार केल्यापेक्षा एकदा स्पर्धा परीक्षा ह्या क्षेत्रात उत्तरवावीत..मग त्याना कळेल विध्यार्थी किती मेहनत घेतात,उराशी किती स्वप्न बाळगतात.असो. राज्य सरकारने आता ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला खरा पण अश्या समित्यांचे काय होते हे महाराष्ट्राला काही नवीन नाही. अश्या समित्यांच कामकाज किती काळ चालत,त्यांचा अहवाल येण्यास किती वेळ लागतो आणि त्या अहवालच काय होत..! जनतेला आणि विध्यार्थ्यांना मूर्ख बनवायचे धंदे चालू आहेत मग सरकार कुठलाही असू द्यात.
मुळात मला प्रश्न पडतो की २ वर्षा पूर्वी परीक्षा पार पडलेली असताना सुद्धा मुलाखतीसाठी एवढा प्रचंड वेळ का घालविण्यात येत आहे..? ती पद भरण्याची गरज नव्हती का ? आणि नसेल तर मग जाहिरात का काढण्यात आली ? विध्यार्थ्यांच्या स्वप्नांसोबत का खेळण्यात आले ? संबंधितांनी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत ? आणि हे सुद्धा सांगावे की यापुढे विद्यार्थ्यांनी अधिकारी बनण्याची स्वप्न उराशी बाळगावे किंवा नाही ? विध्यार्थ्यांना तो अधिकार आहे की नाही ? आणि केवळ उत्तर देऊन चालणार नाही तर स्वप्नील चा बळी जाण्यासाठी व लाखो युवकांचे स्वप्नभंग करण्यासाठी जबादार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा व्हायला हवी. एकतर दरवर्षी मूठभर जागा निघतात आणि ह्या मूठभर पदांसाठी लाखो तरुण आशेने रात्रं दिवस मेहनत घेतात.अनेक तरुण ह्या परीक्षेतच्या तयारीसाठी बाहेरगाववरून त्यातही जास्तीत जास्त तरुण हे खेड्या-पाड्यां कडून पुण्यात आलेले असतात.पुण्याचा खर्च त्यांना झेपावत नसतो तरी सुद्धा काटकसर करून स्वप्नपूर्ती साठी धावपळ करतात. ह्या ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांचा बाप आधीच कर्जा च्या ओझ्याखाली दबलेला असतो.नोकरी मिळत नाही म्हणून पोरग / पोरगी स्वतः च्या जीवाचं काही बर वाईट करून घेईल का.. या शंकेने माय सतत काळजीत असते. आपण यशस्वी झालो की सगळं ठीक होईल,संपूर्ण कुटुंब दारिद्य्रातून वर येईल आणि बापाच्या चेहऱ्यावर हास्य येईल ह्या आशेने ही मुलं पुण्यासारख्या शहरांमध्ये धावपळ करत असतात.प्रसंगी एकवेळ जेवून अभ्यास करतात. आणि माझी मुलं मला बरे दिवस दाखवतील म्हणून बाप स्वतः च्या पोटाला चिमटा काढून पैसे पाठवत असतो.परंतु ह्या सगळ्या गोष्टींची प्रशासनाला कुठे जाण..! ह्या अश्या अनेक बापांच्या पैशावर पुण्यामध्ये एक नवीनच अर्थव्यवस्था उभी राहत आहे. शिकवणी वर्ग,खोल्या भाड्याने देणारे तसेच पुस्तक विक्रेते..सगळेच धावत्या पाण्यात हात धुवून घेत आहेत..असो. अनेक युवक लग्नाचे वय होईपर्यंत परीक्षेची तयारी करत असतात. दरवर्षी ह्या लाखो युवकांपैकी फक्त मूठभर युवकांनाच नौकरी मिळते.आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही तर काय ? याचा कधी विचारच केलेला नसतो...असो. मित्रानो स्वप्न बघणं वाईट नसत.. परंतु स्वप्न पूर्ण झालं नाही तर पुढे काय याचा विचार व नियोजन करून ठेवलेले बरे...नाहीतर फार वाईट परिस्थिती मनामध्ये तयार होते आणि ह्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिकता फार कमी विद्यार्थ्यांमध्ये असते. त्यामुळेच प्लान B आपल्या हातामध्ये असला पाहिजे. मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्यासाठी सांगितल्या कारण मी सुद्धा एकेकाळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पुण्यामध्ये अभ्यास करत होतो..असो. सरकारने मात्र आता गांभीर्याने विचार करायला हवा आणि फक्त विचार करून चालणार नाही तर कृती करायला हवी.नाहीतर लाखो तरुणांची स्वप्ने अशीच मातीमोल होत राहतील.
Barobar
ReplyDelete