हुंड्याची देवाणघेवाण थांबवणार आहात का ?
हुंडामुक्त समाज निर्माण होणार...? - भूषणआप्पा कारंजकर माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार.. जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात ९५ % लग्नात हुंडा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भारतीय समाजासाठी अतिशय लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.भारत स्वातंत्र्य होऊन आज अनेक वर्षे उलटून गेलीत. समाज दिवसेंदिवस सुशिक्षित होत चाल्लाय असे आपण नेहमीच म्हणतो..परंतु समाज खरंच सुशिक्षित झालाय का ? सुशिक्षित म्हणजे फक्त लिहिता वाचता येणे,इंग्लिश मध्ये बोलणे, शिक्षण घेऊन चांगली नौकरी मिळविणे, उच्च राहणीमान असणे बस्स एवढंच असतं का ?. आपला समाज शिक्षण घेतोय खरा परंतु जोपर्यंत.. मानसिक आणि वैचारिक सुशिक्षितता येत नाही तोपर्यंत समाजाला सुशिक्षित म्हणता येणार नाही. भारतातील ग्रामीण भागातच काय शहरी भागात सुद्धा आजही हुंड्यांवरून लग्न मोडण्याचे प्रकार दिसून येतात. आज मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलाचं जेवढं शिक्षण तेवढंच किंवा त्याहीपेक्षा जास्त मुलींचं आहे. मुली विदेशात सुद्धा शिक्षण घ्यायला गेल्यात, मुलींनी चंद्रावर सुद्धा झेप घेतली पण तरी आजही ह्या भारतीय मानसिकतेत हुंडा घेण्याची प्रथा जिवं...